मानवी साखळी रोखणार खडकवासल्याचे प्रदूषण

धूलिवंदन आणि रंगपंचमीनंतर अंगावरील, कपड्यांवरील रंग धुण्यासाठी खडकवासला धरणाच्या पाण्यात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी, "हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थांनी एक संयुक्त उपक्रम राबवला असून त्यानुसार ते धूलिवंदन, रंगपंचमीच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत धरणाच्या कडेने मानवी साखळी उभारणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 01:33 am
मानवी साखळी रोखणार खडकवासल्याचे प्रदूषण

मानवी साखळी रोखणार खडकवासल्याचे प्रदूषण

धूलिवंदन, रंगपंचमीला सकाळी नऊपासून सायंकाळी सातपर्यंत जलाशय रक्षण

नितीन गांगर्डे

feedback@civicmirror.in

धूलिवंदन आणि रंगपंचमीनंतर अंगावरील, कपड्यांवरील रंग धुण्यासाठी खडकवासला धरणाच्या पाण्यात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी, "हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थांनी एक संयुक्त उपक्रम राबवला असून त्यानुसार ते धूलिवंदन, रंगपंचमीच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत धरणाच्या कडेने मानवी साखळी उभारणार आहेत. गेली २० वर्षे 'खडकवासला जलाशय रक्षण अभियान' सुरू असून या वर्षीही ७ मार्च (धूलिवंदन) आणि १२ मार्च ( रंगपंचमी) रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

रंगपंचमी खेळताना आज-काल नैसर्गिक रंगाऐवजी रासायनिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हेच रंग धरणातील पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित होते. रंगपंचमीबरोबर धूलिवंदनाच्या दिवशीही आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी धरणात होणारी गर्दी लक्षणीय असते. यामुळे या दोन दिवसांत धरणातील पाणी  प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. पुणे शहर आणि जिल्ह्याला पिण्यासाठी, शेतीसाठी याच धरणातून पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होऊन आरोग्यावर परिणाम होण्याची भीती अधिक असते.  लोकांची होणारी गर्दी आणि   

रंगपंचमी आणि धूलिवंदन हे सण लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्या दिवशी विविध रंगांची एकमेकांवर उधळण करतानाचा उत्साह टोकाला पोहोचतो. पूर्वी रंगपंचमीवेळी नैसर्गिक रंगाचा वापर होत असे. नंतरच्या काळात मात्र त्यात खंड पडून कृत्रिम रंगाचा जास्त वापर होऊ लागला. यामध्ये रासायनिक रंगाचा वापर अधिक असतो. त्याचा त्वचेवर आणि डोळ्यांवर घातक परिणाम होत असतो. रंगपंचमीवेळी या रासायनिक रंगाच्या वापराने अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे किंवा त्वचेच्या आजारांना सामोरे गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. याशिवाय  रंग खेळून झाल्यानंतर लोक आंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी तलाव, नदी, विहिरीचा आसरा घेतात. याच कारणासाठी पुण्यातील नागरिक खडकवासला धरणावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अंगावरील रंग उतरवण्यासाठी लोक पाण्यात उतरतात. तसेच कपडेही धुतात. त्यामुळे  रासायनिक रंग पाण्यात मिसळून धरणातील पाणी प्रदूषित होते. हेच पाणी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील लोक पिण्यासाठी वापरतात. साहजिकच अशा प्रदूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.  

धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी "हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्‍था आणि खडकवासला ग्रामस्‍थ 'खडकवासला जलाशय रक्षण अभियान' हा एक संयुक्त उपक्रम राबवत आहेत. त्यासाठी धूलिवंदन, रंगपंचमीच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत धरणाच्या कडेने मानवी साखळी उभारणार आहेत. गेली २० वर्षे हे अभियान सुरू असून या वर्षीही ७ मार्च (धूलिवंदन) आणि १२ मार्च ( रंगपंचमी) रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. या दोन्ही दिवशी धरणावर येणाऱ्या लोकांना पाण्याचे पावित्र्य आणि नागरिकांचे आरोग्य याचे महत्त्व पटवून देणार आहेत. तसेच सण, उत्सव साजरे करताना त्याची पर्यावरणाला हानी पोहचू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी दिली. ते म्हणाले की,  हिंदुू संस्कृतीतील प्रत्येक सण-उत्सव पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक उन्नतीला पोषक आहेत. मात्र यातील धर्मशास्त्र अवगत नसल्याने उत्सवामध्ये अपप्रकार शिरले आहेत. त्यामुळे सण-उत्सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला आहे. धूलिवंदन आणि रंगपंचमीला रासायनिक रंगासह धरणात आंघोळीसाठी उतरणे हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या विरोधात आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ या वर्षी ७ आणि १२ मार्च या दोन्ही दिवशी धरणाच्या कडेला मानवी साखळी उभारणार आहेत. या वेळी हातात फलक घेऊन लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. या अभियानात इतरही सहभागी झाल्यास निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या कामास हातभार लागेल. २० वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी जे लोक येथे आंघोळीला येत होते तेच आज या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. 

हिंदू धर्मातील सण हे पर्यावणाचा ऱ्हास करणारे नसून ते पर्यावरण पूरक आहेत. आरोग्यासाठी ते हितकारक आहेत. प्राचीनकाळी ऋषीमुनींनी त्याचे महत्त्व सांगितले आहे. परंतू आता सण हे चुकीच्या पद्धतीने साजरे केले जातात. त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. असे रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी सांगितले. 

या मोहिमेला प्रत्येक वर्षी स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलीस सहकार्य करतात. या वर्षीही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी धनंजय जाधव यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story