वाहतूक पोलिसांना पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' मोहिमेस पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागामुळेच असे विधायक उपक्रम यशस्वी होतात, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या मोहिमेस पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 12:55 am
वाहतूक पोलिसांना पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

वाहतूक पोलिसांना पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

सीविक मिरर, पुणे टाइम्स मिरर आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो'  मोहिमेस पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागामुळेच असे विधायक उपक्रम यशस्वी होतात, असे सांगत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या मोहिमेस पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले.

या महिमेत उस्फूर्तपणे सहभागी होत पुणेकर शहरातील जास्त वाहतूक कोंडीच्या ३० ठिकाणांवर वाहतूक पोलिसांना मदत करत आहेत. नागरिक आपापल्या कामातून वेळ काढून शहराच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी आवर्जून या महिमेत सहभाग घेत आहेत. मोहिमेची घोषणा झाल्याच्या दिवसानंतर  'जरा देख के चलो' मोहिमेचे टी शर्ट परिधान केलेले ज्येष्ठ स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन युवक-युवती शहरातील विविध रस्त्यांवर विशेषतः नगर रस्ता, अलका टॉकीज चौक, गुडलक चौक, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन करताना दिसत आहेत.

पुणे शहर वाहतूक विभागाला वाहतूक व्यवस्थापनासाठी शक्य तेवढी मदत करण्यासाठी यातील प्रत्येकजण दिवसाकाठी चार तासांचा वेळ देत आहेत. वाहतूक विभागाचे मार्शल या स्वयंसेवकांना वाहतूक व्यवस्थापना संदर्भातील आवश्यक ते प्रशिक्षण देत आहेत. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story