इितहासाची पुनरावृत्ती

कसबा पेठविधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान झाले. मतदानानंतरही या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीतील नाट्य अद्यापही कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना आणि त्यानंतर पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घालून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी सोमवारी (दि.. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 28 Feb 2023
  • 12:53 am
इितहासाची पुनरावृत्ती

इितहासाची पुनरावृत्ती

मतदानानंतर पक्षचिन्ह दाखवले तरीही तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना िमळाली होती क्लीनचिट; उपरणेधारी हेमंत रासनेंचे काय होणार?

विजय चव्हाण / अमोल मचाले

vijay.chavan@civicmirror.in/ amol.machale@civicmirror.in

TWEET@VijayCmirror/mirror_Amol

कसबा पेठविधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान झाले. मतदानानंतरही या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीतील नाट्य अद्यापही कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना आणि त्यानंतर पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घालून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी सोमवारी (दि.. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे २०१४ च्या लोकसभा िनवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी मतदान केल्यानंतर सेल्फी घेताना तसेच माध्यमांशी बोलताना पक्षाच्या चिन्हाचे प्रदर्शन केले होते. त्यांच्याविरुद्धही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर यात मोदींना क्लीनचिट मिळाली. धंगेकरांनाही अशीच क्लीनचिट मिळणार की शिक्षा होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

रासने यांनी मतदानादरम्यान पक्षचिन्ह असलेले उपरणे परिधान केल्यामुळे सुमारे ९ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

२०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांच्याबाबतही असेच घडले होते. ३० एप्रिल २०१४ रोजी मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे मतदानाचा हक्क बजावला. नंतर त्यांनी सेल्फी घेताना तसेच माध्यमांशी बोलताना पक्षाच्या चिन्हाचे प्रदर्शन केले होते. या विरोधात विरोधी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची तातडीने दखल घेत निवडणूक आयोगाने मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र, पक्षाचे चिन्ह हे मोदींच्या वेशभूषेचा भाग होता, असे सांगत तेथील न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला होता. आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यातून सहीसलामत बाहेर पडलेल्या मोदींनी २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपला जिंकून दिली होती. आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याच्या पुनरावृत्तीबरोबरच मोदींनी मिळवलेल्या यशाप्रमाणे या पोटनिवडणुकीत रासने विजयाचीही पुनरावृत्ती करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोर लावला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी रविवारी नूतन मराठी विद्यालयातील बुथ क्रमांक ७५ येथे जाऊन मतदान केले. मात्र, यावेळी त्यांनी गळ्यात कमळाचे चिन्ह असलेले उपरणे घातले होते. या प्रकरणी विरोधकांनी आक्षेप घेत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. या संदर्भात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. याची दखल घेण्यात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हेमंत रासनेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोग रासनेंविरोधात नेमकी काय कारवाई करतो, याकडे राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरल्यामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

कसबा पेठेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी शनिवारी (दि. २५) केला होता. या विरोधात ते उपोषणास बसले होते. प्रचाराची मुदत संपल्यानंतर आचारसंहिता सुरू असताना कसबा गणपतीसमोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नाट्याचा पुढचा भाग म्हणजे, आता रवींद्र धंगेकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

रवींद्र धंगेकर यांचे असे म्हणणे आहे की, ‘‘मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा पक्षपातीपणा कशाला करायला हवा?”

“मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझे आहे. पण, निवडणूक यंत्रणा म्हणजे भाजपचे कार्यालय झाले आहे. हेमंत रासनेंनी म्हटलं कसबा हा भाजपचा गड आहे. मात्र, हा जनतेचा गड आहे. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्तीची होती. आमच्या मागे जनता होती. धनशक्तीच्या मागे ज्यांनी पैसे घेतले, ते होते. काही लोकांनी पैसे घेतले मात्र मत धंगेकरांना देणार, असे सांगितले. १५ ते २० हजार मतांनी माझा विजय होणार आहे,’’ असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story