Fraud extortion : माजी महसूलमंत्र्यांचा सचिव असल्याचे भासवून लुटले

महाविकास आघाडी सरकारमधील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सचिव असल्याची बतावणी करून मोठ्या उद्योग समूहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 5 May 2023
  • 01:13 pm
माजी महसूलमंत्र्यांचा सचिव असल्याचे भासवून लुटले

माजी महसूलमंत्र्यांचा सचिव असल्याचे भासवून लुटले

निवृत्त अधिकाऱ्याला तिघांकडून ५९ लाखांचा गंडा

#येरवडा

महाविकास आघाडी सरकारमधील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सचिव असल्याची बतावणी करून मोठ्या उद्योग समूहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गगन रहांडगळे (रा. नागपूर), गोरख तनपुरे, विशाल पवार (रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका निवृत्त अधिकाऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०१३ मध्ये तीन कोटी ६० लाख रुपयांना एका बंगल्याची खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. काही कारणांमुळे त्यांचे हप्ते थकले होते. त्यामुळे त्यांनी बंगल्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना बंगल्याची विक्री करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यांची जागा खरेदी-विक्री करणारा दलाल गोरख तनपुरे याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा त्याने मेहुणा विशाल पवारच्या मार्फत बंगल्याची विक्री करून देतो, असे सांगितले होते. त्यासाठी २५ लाख रुपये कमिशन द्यावे लागेल, असे त्याने सांगितले. २०२१ मध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने घरावरील जप्ती तसेच लिलाव रोखण्यासाठी तातडीने चार कोटी ८० लाख रुपये भरायचे होते. त्यामुळे त्यांनी बँकेकडे कर्जाचे हप्ते कमी करण्याची विनंती केली होती. त्या वेळी आरोपी गोरखने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सचिव परिचयाचा असल्याची बतावणी केली होती. आरोपी गगन रहांडगळेला ऑनलाइन पद्धतीने दहा लाख रुपये पाठविण्यात आले. गोरखने त्यांच्याकडून खर्चासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा २५ लाख घेण्यात आले.

रहांडगळेने त्यांच्याकडे महसूल मंत्र्यांच्या सचिवाची ओळख असल्याचे सांगितले. ते तुम्हाला बंगला परत मिळवून देतील, असे सांगून ३० लाख रुपये घेतले. त्यांना मुंबईला बोलावून घेतले. मुंबईतील एका तारांकित हाॅटेलमध्ये त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, संशय आल्याने त्यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story