वाहतूक योद्ध्यांना भेटलात का?
ओश्विन कढव
पुण्याच्या वाहतूक स्थितीत काही सकारात्मक बदल घडवायचा त्यांचा निर्धार कायम असल्याने वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढत पुणे विद्यापीठ गाठायला त्यांना तासभर वेळ लागला. अंगाला चटका देणारे ऊन आणि मध्येच कोसळणाऱ्या पावसांच्या सरी असे विषम हवामान अंगावर झेलत त्यांनी निर्धारित स्थान गाठले. फ्लेम विद्यापीठाचे रिद्धी शाह, सारन्या मेनन, मिहीर पिल्लामरी, शरयू पेडणेकर, क्रांती गुप्ता, श्रृती भाट, ओम रावत, साई अनन्या मल्लाप्राग्दा आणि क्रेसिडा मॅथ्यू हे नऊ योद्धे उत्साहाने भारलेल्या अवस्थेत विद्यापीठ चौकात आले आणि क्षणात बनले रस्त्याचे राजे. ‘जरा देख के चलो’ उपक्रमाचे टी शर्ट, नागरिकांचे वाहतूक प्रबोधन करणारी घोषवाक्ये असलेले फलक आणि हातात शिट्टी अशा पोषाखातील या लढवय्यांनी तातडीने वाहतूक नियमनास सुरुवात केली. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमाची जेव्हा त्यांना माहिती कळाली तेव्हा त्यांनी ही संधी साधायची असे ठरवले. आयुष्यातील काही तास व्यतित करून या उपक्रमात सहभागी होण्याचे त्यांनी ठरवले.
वर्दळीच्या आनंद ऋषी चौकातील वाहतूक पोलिसांनी त्यांना झटपट प्रशिक्षण दिले. मूलभूत वाहतुकीच्या नियमाबद्दल त्यांना माहिती दिली. तसेच वाहतुकीची गती कशी कायम राखायची, पादचाऱ्यांना कोणती मदत करायची, नियमभंग करणाऱ्यांचे कसे प्रबोधन करायचे याचा मूलमंत्रही त्यांना दिला. वाहतुकीच्या दृष्टीने पुणे अधिक चांगले करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि असा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल या योद्ध्यांनी मिररचे मनापासून आभार मानले.
‘जरा देख के चलो’ प्रेझेंटेड बाय ग्रॅव्हीट्टस फाऊंडेशन, को-पॉवर्ड बाय द मिल्स पुणे ॲण्ड सेलेबिलिटी ॲण्ड इन असोसिएशन विथ न्याती ग्रुप. कॅम्पेन सपोर्टेड बाय लोकमान्य सहकारी सोसायटी आणि शिवतारा प्रापर्टीज. उपक्रमाचे नॉलेज पार्टनर कुश चतुर्वेदी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.