आजीच्या सोनसाखळी चोराला नातीचा हिसका

पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्याला दहा वर्षांच्या नातीने हाताने मारून पळवून लावल्याची घटना घडली आहे. चोराला पळवून लावणाऱ्या ऋत्वी घाग हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 11:52 am
आजीच्या सोनसाखळी चोराला नातीचा हिसका

आजीच्या सोनसाखळी चोराला नातीचा हिसका

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावली चेन; चिमुकलीच्या चतुराईमुळे चोरट्याची धूम

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्याला दहा वर्षांच्या नातीने हाताने मारून पळवून लावल्याची घटना घडली आहे. चोराला पळवून लावणाऱ्या ऋत्वी घाग हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दररोज चार ते पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. अशीच घटना शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये घडली. येथे राहणाऱ्या लता घाग या आजी संध्याकाळी आठच्या सुमारास दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी २५ ते ३० वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या आजीला पत्ता विचारला. त्यावर आजी पत्ता सांगत असताना चोरट्याने आजूबाजूला पाहत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

लता घाग यांनी 'चोर चोर' म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यापासून ५  फुटांच्या अंतरावर असलेल्या दहा वर्षीय ऋत्वी वाघ हिने धावत जाऊन चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. मात्र चोरट्याने हिसका देऊन तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

आजीने चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केल्यावर आजीपासून पाच फुटांच्या अंतरावर असलेल्या दहा वर्षीय ऋत्वी घाग हिने समयसूचकता दाखवत धावत जात त्या चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. तर आजीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने हिसका देऊन तेथून पळ काढला. मात्र, अशा चोरीच्या घटना वाढत असल्याने पुणे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story