Wagholi Fire : मंडपाच्या गोडाऊनला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

वाघोली येथील कवडे वस्ती, उबाळेनगर परिसरात मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागून तिघांचा होरपळून मृत्यू झाला. ‘‘चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग झपाट्याने पसरली. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत,’’ अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 7 May 2023
  • 05:57 pm
मंडपाच्या गोडाऊनला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

मंडपाच्या गोडाऊनला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

वाघोली येथील कवडेवस्तीतील घटना, चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भडकली आग

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

वाघोली येथील कवडे वस्ती, उबाळेनगर परिसरात मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागून तिघांचा होरपळून मृत्यू झाला. ‘‘चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग झपाट्याने पसरली. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत,’’ अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

वाघोलीजवळ असलेल्या उबाळेनगर परिसरात लग्नाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमध्ये चार सिलिंडर फुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोदामात लग्नाची सजावट, लाइटिंग, तारा, गाद्या, गालिचे आणि पेंटिंग अशा साहित्याचा साठा होता. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली. अग्निशमन अधिकार्‍यांना याची माहिती  मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तातडीने आपापली पथके घटनास्थळी रवाना केली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत जवानांना तीन कामगारांचे मृतदेह आढळून आले. शहर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.  

आग लागलेल्या गोडाऊनच्या शेजारीच चारशे सिलेंडर भरलेले गोडाऊन आहे. मात्र सुदैवाने या भागात आग लागली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. मृतदेह पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की आगीचे लोट खूप दूरवरून दिसत होते.

“आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या पाच अग्निशमन गाड्या आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग लवकर विझवण्यासाठी आम्ही काही खासगी पाण्याच्या टँकरचीही व्यवस्था केली होती,’’ 

अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story