मुलींनी आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे :राजेश कोठावदे

मुलींनी आपल्या आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. मासिक पाळीसंदर्भात न घाबरता शिक्षिकांशी संवाद साधून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे गव्हर्नर एम. जे. एफ. लायन राजेश कोठावदे यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Mar 2023
  • 02:50 pm
मुलींनी आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे :राजेश कोठावदे

मुलींनी आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे :राजेश कोठावदे

#सांगवी

मुलींनी आपल्या आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. मासिक पाळीसंदर्भात न घाबरता शिक्षिकांशी संवाद साधून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे गव्हर्नर  एम. जे. एफ. लायन राजेश कोठावदे यांनी केले आहे.

लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीतर्फे छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे विद्यालयात सॅनिटरी पॅड इन्स्टॉलेशन व सॅनेटरी पॅक डिस्कार्ड मशिन बसवण्यात आले. या मशिनच्या उद्घाटनप्रसंगी कोठावदे बोलत होते. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांच्या प्रयत्नातून या मशिन शाळेत बसवण्यात आल्या आहेत. 

मोठमोठ्या शाळांमध्ये अशा मशिन नाहीत पण तुमच्या शाळेत लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीतर्फे या मशिन बसवल्या आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. या मशिनचा योग्य वापर मुलींनी करावा, असेही कोठावदे म्हणाले. यावेळी कोठवदे यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक यांना लायन्स डिस्ट्रिक्टचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.  याप्रसंगी लायन्स क्लब पुणे रहाटणीचे पदाधिकारी वसंत भाऊ कोकणे, धनराज मंघनानी, धीरज कदम, हेमंत रसाळ, अशोक बनसोडे, समीर अग्रवाल, जॉनी थदानी, डॉ. दिलीपसिंह मोहिते, प्रमोद बोंडे, ज्ञानदेव बोंडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, सेवक वर्ग, विद्यार्थी, पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी तर निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story