तरुणीची दीड लाखाची फसवणूक
पिंपरी चिंचवडमधील दिघी येथील ऑनलाईन जॉब शोधत असताना एका तरुणीची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार २१ ते २३ एप्रिल या कालावधीत घडला. या प्रकरणी एका युजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणी ऑनलाईन पद्धनीते नोकरी शोधत होती. या दरम्यान, तिला क्रिप्टो करन्सी संबंधित एका लिंक मिळाली. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक नफा होईल, असे त्यात आमिष दाखविण्यात आले होते.
सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तरुणीने तब्बल एक लाख ५९ हजार रुपये गुंतवले. मात्र तरुणीला कोणताही नफा झाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एका युजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.