श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी आतापर्यंत ३,२०० कोटी जमा

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी न्यासाच्या कोशात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 9 Aug 2023
  • 02:39 pm
श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी आतापर्यंत ३,२०० कोटी जमा

श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी आतापर्यंत ३,२०० कोटी जमा

श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांची माहिती

#पुणे

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी न्यासाच्या कोशात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, ‘‘मंदिर निर्माणासाठी आतापर्यंत विदेशातून कुठल्याच प्रकारची देणगी स्वीकारली गेलेली नाही. त्यासाठीच्या परवानगीला शासनाकडे अर्ज केलेला आहे. त्याला मंजुरी मिळताच विदेशातून येणाऱ्या देणग्या स्वीकारल्या जाणार आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्रभू श्रीरामासह मंदिरातील देव देवतांना पुण्यात तयार झालेलं वस्त्र चढवलं जाणार आहे.’’

विशेष बाब म्हणजे हे वस्त्र हातमागावर विणलं जाणार आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील भक्तगण या कार्यात सहभागी होऊ शकणार आहेत. त्या दृष्टिकोनातून 'दो धागे श्रीराम के लिये ' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवतील. येत्या १० ते २२ डिसेंबरदरम्यान पुण्यातील सूर्यकांत काकडे फार्म या ठिकाणी हा उपक्रम साजरा होणार आहे.

त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यातून हातमाग दाखल होणार आहेत. हेरिटेज हँडविविंग रिवायव्हल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  वस्त्र विणण्याआधी नागरिकांना ते कसे विणावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. या उपक्रमात विणण्यात येणारे वस्त्र रेशमाचे असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story