‘फ्लूविर’सुद्धा ‘रेमडेसिविर’ च्या वाटेने

'इन्फ्ल्युएन्झा' आणि 'इन्फ्ल्युएन्झा ए'चा उपप्रकार असलेल्या 'एच३एन२ विषाणूमुळे होणाऱ्या आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा तुटवडा पुणे शहरात जाणवत आहे. या आजाराची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टर 'फ्लूवीर' औषधे घेण्यास सांगत आहेत. मात्र, शहरातील अनेक मेडिकलमध्ये ते औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 11:20 am
‘फ्लूविर’सुद्धा ‘रेमडेसिविर’ च्या वाटेने

‘फ्लूविर’सुद्धा ‘रेमडेसिविर’ च्या वाटेने

'इन्फ्ल्युएन्झा'च्या औषधांसाठी रुग्णांची वणवण; शहरातील अनेक प्रमुख मेडिकल स्टोअरमध्ये 'फ्लूवीर'चा तुटवडा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

'इन्फ्ल्युएन्झा' आणि 'इन्फ्ल्युएन्झा ए'चा उपप्रकार असलेल्या 'एच३एन२ विषाणूमुळे होणाऱ्या आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा तुटवडा पुणे शहरात जाणवत आहे. या आजाराची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टर 'फ्लूवीर' औषधे घेण्यास सांगत आहेत. मात्र, शहरातील अनेक मेडिकलमध्ये ते औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.  

सध्या देशभरात इन्फ्ल्युएन्झा ए, बी, सीच्या विषाणूंची संख्या वाढलेली आहे. 'इन्फ्ल्युएन्झा ए'चा उपप्रकार असलेल्या 'एच३एन२' चेही रुग्ण वाढलेले आहेत. प्रामुख्याने पाच वर्षांच्या आतील मुले, वयोवृद्ध यांच्यात या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. रुग्णाला १०२ अंशांपेक्षा जास्त ताप असेल आणि त्यासोबतच घसादुखी, नाक गळणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया व उलट्या अशी लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी तातडीने 'ऑसेल्टेमिव्हिर' ही अँटिव्हायरल औषधे सुरू करावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने डॉक्टरांना दिल्या आहेत. सध्या तापाच्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. 'ऑसेल्टेमिव्हिर'चे ब्रँड 'टॅमी फ्लू' आणि 'फ्लूवीर' आहे. शहरातील डॉक्टरही रुग्णांना हे औषध घेण्यास सांगत आहेत. मात्र, पुणे शहरातील अनेक मेडिकलमध्ये या औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून येत आहे.

"आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांनी फ्लूवीर औषध घेण्यास सांगितले आहेत. सदाशिव पेठेतील अनेक मेडिकलमध्ये या औषधाचा शोध घेतला, मात्र ते कोठेच मिळाले नाही", असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. हे औषध २०१० मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती तेव्हा तयार करण्यात आले आहे. डॉक्टर औषधे घेण्यासाठी सांगतात, परंतु स्थानिक पातळीवर ते उपलब्ध होत नाही. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या मेडिकलमध्येही त्याचा तुटवडा आहे. ते फक्त मोठ्या मेडिकलमध्ये किंवा मोठ्या हॉस्पिटलशी जोडलेल्या मेडिकलमध्येच उपलब्ध होत आहे. कदाचित स्वाईन फ्लूची साथ ओसरल्यावर या औषधांचे उत्पादन थांबवले गेले असेल.

'फ्लूविर' औषध हे खरेच या आजारासाठी उपायकारक आहे का? याबाबत मनात शंकाच आहे. याचे कारण कोरोनामध्ये रेमडीसीवर हे औषध घेण्यास डॉक्टर सांगत होते. काही काळानंतर याविषयी माहिती समजली की, त्या वेळी कोरोनावर ठोस काहीच औषध नसल्याने  'ट्राय अँड एरर'च्या आधारावर त्याचा प्रयोग केला जात होता. त्यामुळे 'एच३एन२' यावर खरेच 'फ्लूविर' हे रामबाण उपाय आहे का, हे सरकारने स्पष्ट करावे. याचा असाच तुटवडा भासत राहिला तर ते आहे त्या किमतीच्या अनेक पटीने काळ्या बाजारात विकले जाण्याची शक्यता आहे. त्याची साठेबाजीही होऊ शकते. याचा रुग्णांना मोठा फटका बसेल', असे अनिकेत राठी यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story