'एसएसपीएमएस'च्या फार्मसी महाविद्यालयात आग

श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या (एसएसपीएमएस) औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत शुक्रवारी अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, आर्थिक हानी झाली असण्याचा संभव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:38 am
'एसएसपीएमएस'च्या फार्मसी महाविद्यालयात आग

'एसएसपीएमएस'च्या फार्मसी महाविद्यालयात आग

प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक भस्मसात; जीवितहानी नाही

#पुणे स्थानक रस्ता

श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या (एसएसपीएमएस) औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत शुक्रवारी अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, आर्थिक हानी झाली असण्याचा संभव आहे. 

संगम पूल परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेचे फार्मसी महाविद्यालय आहे. तेथे शुक्रवारी हा प्रकार घडला. महाविद्यालयाच्या इमारतीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील प्रयाेगशाळेत दुपारच्या वेळी अचानक आग लागली. 

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रातील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि कोणत्याही प्रकारे जीवितहानीदेखील झालेली नाही. 

आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, फ्रीज जळाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

feedback@civicmirror.in

Share this story