नगर रस्त्यावर अखेर अतिक्रमणविरोधी कारवाई

पुणे-नगर रस्त्यावरील अतिक्रमण पुणे महानगरपालिकेने रविवारी हटवले. महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्यातर्फे गुंजन चौक ते वाघोली वाघेश्वर मंदिर चौकादरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी पदपथावरील अनधिकृत शेड हटवण्यात आले. या परिसरात बेकायदेशीररीत्या ठाण मांडून बसलेले पथारीवाले, फेरीवाले फळ, फूल, ऊसरस, चष्मे, टायर पंक्चर दुरुस्तीवाल्यांवर कायदेशीर कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:36 am
नगर रस्त्यावर अखेर अतिक्रमणविरोधी कारवाई

नगर रस्त्यावर अखेर अतिक्रमणविरोधी कारवाई

अनधिकृत शेड हटवले, हातगाडी, पथारीवाले, फेरीवाल्यांवर केली कारवाई

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुणे-नगर रस्त्यावरील अतिक्रमण पुणे महानगरपालिकेने रविवारी हटवले. महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्यातर्फे गुंजन चौक ते वाघोली वाघेश्वर मंदिर चौकादरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी पदपथावरील अनधिकृत शेड हटवण्यात आले. या परिसरात बेकायदेशीररीत्या ठाण मांडून बसलेले पथारीवाले, फेरीवाले फळ, फूल, ऊसरस, चष्मे, टायर पंक्चर दुरुस्तीवाल्यांवर कायदेशीर कारवाई केली.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकच्या उपायुक्त किशोरी शिंदे, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त नामदेव बजबळकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी गुंजन चौक ते वाघोली वाघेश्वर मंदिर चौकादरम्यानचे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, फ्लेक्स हटवण्यात आले. मोठ्या प्रमाणात अनधिकृत साहित्य, हातगाड्या, छत्री, आईस्क्रीमचे गाडे, फुले, फळे इत्यादी जप्त करण्यात आले. पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे यापूर्वीही अशी कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर परिसरात पुन्हा अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण विभाग गुंजन चौक ते वाघोली व अंतर्गत वाहतुकीच्या गर्दीच्या ठिकाणी यापुढेही अशीच कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच  वारंवार नियमांचा भंग करून अनधिकृतपणे रस्ता, पादचारी मार्गावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हे नोंदवण्यात येणार असल्याचा इशारा नामदेव बजबळकर यांनी दिला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story