रिलेशनशिपनंतरही तरूणाचा िववाहास नकार

पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असतानाही संबंधित तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून दौंड शहरामध्ये एका तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात निखिल साबळे (रा. मोरेवस्ती ता. दौंड जि. पुणे) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड पोलिसांनी दाखल केला असून याबाबत तरुणीचा भाऊ कौशल गायकवाड याने दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 13 Mar 2023
  • 01:43 pm
रिलेशनशिपनंतरही तरूणाचा िववाहास नकार

रिलेशनशिपनंतरही तरूणाचा िववाहास नकार

दौंडमध्ये तरुणीची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या; आरोपीस अटक

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असतानाही संबंधित तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून दौंड शहरामध्ये एका तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात निखिल साबळे (रा. मोरेवस्ती ता. दौंड जि. पुणे) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड पोलिसांनी दाखल केला असून याबाबत तरुणीचा भाऊ कौशल गायकवाड याने दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण साक्षी गायकवाड ही दौंड येथे एका कंपनीत काम करत होती. तिचे निखिल साबळे या तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, फिर्यादीला आपली बहीण थोडी टेन्शनमध्ये असल्याचे दिसले. भावाने विचारणा केली असता तिने सांगितले की, माझे निखिल साबळे याच्या सोबत गेले पाच वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण तो माझ्यासोबत लग्न करण्यास नकार देत आहे. मी त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरूनही तो सतत नकार देत आहे. त्यामुळे माझी जगण्याची इच्छा राहिली नाही. त्यानंतर कौशल गायकवाड याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशी १२ मार्च म्हणजे आज सकाळी फिर्यादी झोपेत असताना दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घरात जाऊन पाहिले असता त्याला बहीण साक्षी ही घरात दिसली नाही. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याने टेरेसवरून खाली पाहिले तर त्याला साक्षी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले. तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

त्यामुळे आरोपी निखिल साबळे याने साक्षी हिच्यासोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story