‘एम्प्रेस’ झाले लंकेची पार्वती

चाळीस एकरच्या भव्य परिसरात पसरलेले चा आस एकच्या भेटून अधिक वयोमानाची वृक्षराजी असलेले एम्प्रेस गार्डन म्हणजे पुण्याचे वैभव यातील काही झाडे तर दुर्मीळातील दुर्मीळ आणि घनदाट असून एम्प्रेस गार्डन म्हणजे पुण्याचे 'अर्बन फॉरेस्ट'च म्हणता येईल. एम्प्रेस गार्डनचे हे वर्णन मनाला मोहून टाकणारे असले तरी आता एखादा फेरफटका मारला तर विरोधाभास झटकन नजरेत येतो. शहराचे वैभव असलेले एम्प्रेस गार्डन म्हणजे सम्राज्ञीची बाग आता लंकेतील पार्वती बनण्याच्या मार्गावर असल्याचे म्हणता येईल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Mar 2023
  • 01:33 pm
‘एम्प्रेस’ झाले लंकेची पार्वती

‘एम्प्रेस’ झाले लंकेची पार्वती

दुरावस्थेतील तळे, बाजूला दारूच्या बाटल्यांचा खच, मोडकी खेळणी यामुळे पुण्याचे वैभव असणारे एम्प्रेस गार्डन लंकेची पार्वती बनत आहे.

विनीता देशमुख

vinita.deshmukh@punemirror.com

TWEET@VinitaDeshmukh

चाळीस एकरच्या भव्य परिसरात पसरलेले चा आस एकच्या भेटून अधिक वयोमानाची वृक्षराजी असलेले एम्प्रेस गार्डन म्हणजे पुण्याचे वैभव यातील काही झाडे तर दुर्मीळातील दुर्मीळ आणि घनदाट असून एम्प्रेस गार्डन म्हणजे पुण्याचे 'अर्बन फॉरेस्ट'च म्हणता येईल. एम्प्रेस गार्डनचे हे वर्णन मनाला मोहून टाकणारे असले तरी आता एखादा फेरफटका मारला तर विरोधाभास झटकन नजरेत येतो. शहराचे वैभव असलेले एम्प्रेस गार्डन म्हणजे सम्राज्ञीची बाग आता लंकेतील पार्वती बनण्याच्या मार्गावर असल्याचे म्हणता येईल.

कधीकाळी स्फटिकासारखे स्वच्छ पाणी असलेल्या आणि कमळाच्या फुलांनी बहरलेल्या गार्डनमधील मध्यभागी असलेले तळे आता कचरा, डास आणि बुरशीने भरलेले असल्याचे मिररच्या प्रतिनिधीला मंगळवारी दिलेल्या भेटीत आढळले. जुन्या काळाची आठवण करून देणारे तळ्याच्या आसपास ठेवलेले लोखंडी बाक आता मोडकळीला आले असून अस्ताव्यस्त पसरले आहेत. लहान मुलांची खेळण्याची अनेक उपकरणे इकडे-तिकडे पडलेली, जी खेळणी चांगली आणि खेळण्यासारख्या स्थितीत आहेत, त्यामुळे मुलांच्या आरोग्याला, सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या स्थितीत होती. सगळ्यांत वाईट गोष्ट म्हणजे पिकनिकसाठी आलेल्यांनी दारूच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या तशाच झाडाखाली टाकून दिलेल्या आढळल्या.

एम्प्रेस गार्डनच्या स्थितीबाबत एक पालक म्हणाले की, मुलांची खेळण्याची साधने गंजलेली असून झोपाळे तर मोडलेल्या स्थितीत असल्याने येथे आल्यावर एक विषण्णतेची भावना मनावर पसरते. त्यातच साचलेल्या पाण्यामुळे येथे डास मोठ्या प्रमाणावर असून मिनिटभर थाबले तरी फोडून काढतात. एवढे असू गार्डनवरील लोकांचे प्रेम काही कमी झालेले नाही. आजही तेथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आनंदी आणि प्रसन्न वातावरणात प्री-वेडिंग शूटसाठी येथे मोठी गर्दी असते ती येथील निसर्गामुळे. त्यातच रुपा बजाज आर्ट सेंटरमध्ये अनेक संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम सतत होत असतात. थोडक्यात, एम्प्रेस गार्डन अजूनही पुणेकरांच्या हृदयात आहे, गरज आहे ती निगा राखण्याची, काळजी घेण्याची, लक्ष देण्याची, वैभव टिकवण्याची.

१८३८ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या गार्डनला सोल्जर्स गार्डन या नावाने ओळखले जायचे. पुण्यातील नैसर्गिक संपदेचे जतन करणाऱ्या काही ठिकाणांपैकी एक म्हणजे एम्प्रेस गार्डन. १९९० पासून आघाडीचे उद्योजक, पश्चिम भारत कृषी - फलोत्पादन संघटना एम्प्रेस गार्डनची देखभाल करतात. राहुल बजाज यांच्या निधनानंतर आता पश्चिम भारत कृषी- फलोत्पादन संघटनेचे अध्यक्षपद प्रतापराव यांच्याकडे आलेले आहे. ते याबाबत म्हणाले की, तुम्ही सांगता ती स्थिती ऐकून मला आश्चर्य वाटले. १९९० च्या सुमारास तेथे अनुचित लोकांचा जास्त वावर होता. त्यानंतर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर आणि शरद पवार यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीला मी हजर होतो. त्यावेळी शंतनुरावांनी गार्डनचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन कमालीचे दुर्लक्ष आणि अनास्थेचे दर्शन घडवणाऱ्या केले होते.

त्यावेळी पवार यांच्या प्रयत्नांमुळे काही निधी मिळाला. राहुल बजाज यांनीही पाच कोटींची देणगी दिली. विशेष महत्त्वाचे म्हणजे पश्चिम भारत कृषी-फलोत्पादन संघटनेशी संबंधित असलेल्या अनेक बड्या उद्योजकांनी हात दिल्याने एम्प्रेस गार्डनचा पूर्वीचा दर्जा राखण्याचे काम करता आले. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा बागेला भेट दिली त्यावेळीही तेथील स्थिती चांगली होती. तरीही तुम्ही म्हणता तसे असेल तर तेथील स्थिती सुधारण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू.   

मानद सचिव सुरेश पिंगळे म्हणाले की, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गार्डनचा दर्जा काटेकोरपणे टिकवायचा असेल तर वर्षाला किमान एक कोटीची आम्हाला गरज आहे. स्थानिक संस्था, राज्य किंवा केंंद्र सरकारकडून आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. नर्सरी किंवा गार्डनमधील जागा वेगवेगळ्या कारणांसाठी भाड्याने देऊन येणाऱ्या पैशांतून गार्डनची देखभाल केली जाते. एम्प्रेस गार्डनच्या सौंदर्यास एक वारसा असून  संवर्धन करण्याची जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी सध्या आम्ही जे काही करतो आहे, ते पुरेसे नाही याची आम्हाला जाणीव आहे. 

उपाध्यक्ष सुमनताई किर्लोस्कर म्हणाल्या की, एम्प्रेस गार्डनच्या मोक्याच्या जागेवर गेल्या काही वर्षांपासून काही हितसंबंधी घटकांचा डोळा असल्याचे  लक्षात आले आहे. यावर पिंगळे म्हणतात की, एम्प्रेस गार्डनची जागा मोक्याची असून अनेक राजकारणी, नोकरदार, बिल्डरांचा यावर डोळा आहे. गार्डनची चार एकर जागा आरडब्ल्यूआयटीसीने अगोदरच ताब्यात घेतली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी राज्य सरकारला एम्प्रेस गार्डनच्या ताब्यातील एक-दोन एकर जागा हवी आहे. ट्रस्टच्या ताब्यात एम्प्रेस गार्डन असल्याने आतापर्यंत ही जागा आम्ही वाचवू शकलो. आमच्या हातातून जागा गेली तर भविष्यात काय होईल हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे एम्प्रेस गार्डनचे मूळ सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सरकारने निधी देण्याची गरज आहे.    

एम्प्रेस गार्डनची स्वत:ची वेबसाईट नाही. पुणे महापालिकेलाही आपल्या वेबसाईटमध्ये याचा समावेश करण्याची गरज वाटत नाही. www.yometro.com या वेबसाईटवर गेला तर एम्प्रेस गार्डनमधील आश्चर्यजनक माहिती मिळते. गार्डनमध्ये २५० वर्षांचे वडाचे, १५० वर्षे जुनी कांचन वेल आणि ३० मीटर उंचीचे बांबू असल्याची माहिती येथे मिळते. एम्प्रेस गार्डनच्या फुलांच्या प्रदर्शनाला पुणेकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. 

लाल मातीवर निसर्गाने सजवलेले एम्प्रेस गार्डन एक सुंदर अर्बन फॉरेस्ट असले तरी पुणेकरांच्या दृष्टीने सध्याची स्थिती चिंताजनक आहे, मात्र पुणे महापालिका, कॅन्टोन्मेट बोर्ड, राज्य आणि केंद्र सरकारला तसे काही वाटत नाही त्याचे काय?

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story