‘बाहेरील’ मतदारांवर भर

उद्योगनगरीत नोकरी कमधंद्यासाठी आलेल्या मराठवाडा विदर्भातील कष्टकऱ्यांना मतदानाची साद घालण्यासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने याच मतदारांसाठी धनंजय मुंडे यांची सभा घेऊन उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते भास्कर जाधव आदींसह नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 21 Feb 2023
  • 03:07 pm
‘बाहेरील’ मतदारांवर भर

‘बाहेरील’ मतदारांवर भर

मराठवाडा, विदर्भातील मतदारांना साद! धनंजय मुंडे, रोहित पाटील, रावसाहेब दानवे चिंचवडमध्ये मतदारांच्या दारी

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

उद्योगनगरीत नोकरी कमधंद्यासाठी आलेल्या मराठवाडा विदर्भातील कष्टकऱ्यांना मतदानाची साद घालण्यासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने याच मतदारांसाठी धनंजय मुंडे यांची सभा घेऊन उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते भास्कर जाधव आदींसह नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबासह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबदारी सांभाळताना काय कसरत करावी लागते, याची मला जाणीव आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जनता तेव्हा माझ्या पाठीशी उभी राहिली. 

आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही माझ्या सारख्या स्थितीतून जावे लागत असल्याने माझ्याप्रमाणे अश्विनी जगताप यांच्या पाठीशी उभे राहा असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी त्याच सभागृहात येऊन नोकरीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या मराठवाडा, विदर्भातील नागरिकांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, पोटनिवडणूक होऊ नये अशी आमची पण इच्छा होती. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या निधनापूर्वी दोन महिने आधीच निवडणुकीची तयारी केली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावर २८ वर्ष शरद पवार आणि अजित पवार यांचा हात होता. शहरात झालेला विकास अजित पवारांनी केलाय. बारामतीपेक्षा जास्त प्रेम पिंपरी-चिंचवडवर अजित पवारांनी केले. जगताप भाजपमध्ये गुद्मरल्या सारखे होते. भाजपने भ्रष्टाचारात सगळ्यात खालची पातळी गाठल्याची टीका त्यांनी केली.

ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी -रोहित पाटील

प्रवाहाच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राने या आधीही स्वतःचे अस्तित्व जिवंत ठेवले असल्याचे सांगत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी सत्तासंघर्षावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, 

ठाकरे कुटुंबीयांसाठी आताचा काळ कठीण आहे. मात्र, संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्या सोबत कायम असल्याचे रोहित म्हणाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील यांनी युवकांना घेऊन प्रचार केला. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चालवलेल्या मनमानी कारभाराला चिंचवडमधील नागरिक कंटाळले आहेत आणि त्यामुळे नाना काटे यांना ते निवडून देतील असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीने सत्तेत असताना काय केले? - कलाटे

अहंकारामुळेच राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली. मला काय अहंकारी म्हणता या शब्दात राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादीची महापालिकेत १५ वर्षे सत्ता होती. असे असतानाही चिंचवडकरांना पाण्यासारख्या जीवनावश्यक समस्येला सामोरे जावे लागते. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे हे स्पष्ट होते. विकासाच्या वल्गना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन खुली चर्चा करावी, असे आव्हान अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या सभेत बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका केल्यानंतर आता कलाटे यांनी कडवट भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

...तर घरी बसवले नसते -रावसाहेब दानवे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विकास केल्याचा ढोल पिटत आहे. मात्र, जर तुम्ही विकास केला असता तर मतदारांनी तुम्हाला राज्यात त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडला घरी बसवले नसते. आज पिंपरी-चिंचवडमधील विकास कामांना राज्य सरकार तसेच केंद्रातून वेळोवेळी निधी आणून अवघ्या पाच वर्षात शहराचा कायापालट करण्याचे धोरण आमदार-खासदारांनी राबविल्यामुळे आज पिंपरी-चिंचवडची ओळख जगाच्या पाठीवर आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे विकासाचे ध्येय नियतीमुळे अर्ध्यावरच मोडल्याने त्यांच्या पत्नी उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून देऊन उर्वरित विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे यावेळी यावेळी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story