बनावट नोटा देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले
पुण्यातील खराडी परिसरात एका ट्रिपल देतो असे म्हणत एका तरुणाची ५ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी उत्तर प्रदेशमधील आमदार आणि मंत्र्याचा मुलगा असल्याचे सांगून बनावट नोटा तयार केल्या. हा प्रकार ३० मार्च ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला आहे.
या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात विकासकुमार रावत, रुपाली राऊत, समीर ऊर्फ विशाल घोगरे, संजयकुमार पांडे आणि अशोक पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली राऊत हिने आपण मंत्री असल्याचे व संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील वाटणार्या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगितले.
त्यानंतर तरुणाला या टोळी बनावट नोटा कशा बनवायच्या या डेमो दाखविला. अशा डेमोतून बनविलेल्या ५-६ नोटा तरुणाला देऊन विश्वास संपादित केला. त्यानंतर तिप्पट बनावट नोटा देतो असे सांगून दहा लाख रुपयांची मागणी सुरुवातीला तरुणाकडे करण्यात आली होती. परंतु तरुणाने ५ लाख ३४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्या. मात्र तरुणाने बनावट नोटा मागितल्यानंतर टोळक्यांनी थेट बंदुकीचा धाक दाखवून पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.