अमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या

पोलिसांनी दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (एनडीपीएस) कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि ड्रग्ज तस्करही वाढत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 10:57 am
अमली पदार्थ विकणाऱ्या  दोन परदेशी नागरिकांना बेड्या

अमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या

#कोंढवा

पोलिसांनी दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (एनडीपीएस) कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि ड्रग्ज तस्करही वाढत आहेत. कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कॅथा एड्युलिस फर्टिलायझर हा अमली पदार्थ पहिल्यांदाच जप्त केला.

पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील अमली पदार्थ विक्रेते आणि अवैध धंद्यांची माहिती मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार पहिल्या छाप्यात, अमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना यांना २१ मार्च रोजी एक विदेशी नागरिक जवळच्या सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. उंड्री येथील एका परदेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले  आणि २३ ग्रॅम १३० मिलिग्राम कोकेन, एक मोबाईल फोन, ४,६२,६०० रुपये किमतीची एक दुचाकी आणि ७५,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ५,४७,६०० रुपयांचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. कोकेन बेकायदेशीर ताब्यात असल्याचे आढळून आले आणि त्याने हे अमली पदार्थ परदेशी भागीदाराकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या छाप्यात, कोंढवा परिसरातील राहत्या घरी एक विदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोंढवा बुद्रुक येथे छापा टाकण्यात आला. एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८,७३,५१० रुपये किमतीचे ८ किलो ३९३ ग्रॅम कॅथा एड्युलिस फर्टिलायझर, इतर अमली पदार्थ ५,८७,५१० रुपये, २,७००० किमतीचे विदेशी चलन आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story