‘विरुद्ध दिशेने वाहन चालवू नका’
ओश्विन कढव
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून देण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यामुळे ‘डोन्ट ड्राइव्ह ऑन द राँग साईड’ च्या घोषणा देताना तशाच आशयाचे संदेश देणारे फलक उंचावत ते रस्त्यावर उभे होते. ‘सीविक मिरर’ आणि पुणे ‘टाइम्स मिरर‘ ने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या आगळ्या उपक्रमात एफसी रोडच्या निवासी असलेल्या पद्मिनी पानसे या सहभागी झाल्या होत्या. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत काही बदल घडविण्याच्या उद्देशाने या उपक्रमात सहभागी झालेल्या पानसे राँग साईडने वाहने चालवू नका, असे वाहनचालकांना आवाहन करत होत्या.
आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या पद्मिनी पानसे म्हणाल्या की, माझ्या कॅफेमध्ये काम करत असलेल्या एका सहकाऱ्याला राँग साईडने येणाऱ्या चालकाने धडक दिली. त्याची कोणतीही चूक नसताना त्याला हेअर लाईन फ्रॅक्चरमुळे उपचार घ्यावे लागले. हे खरे तर अनावश्यक होते. वाहतूक नियमांचे कसोशीने पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे मी वाहनचालकांना ‘डोन्ट ड्राइव्ह ऑन द राँग साईड’ असे आवाहन करत असते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.