रोझरी स्कूलच्या संचालकांना अटक

लष्कर भागातील रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. अरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने २० मार्चपर्यंत ’ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:30 am
PuneMirror

रोझरी स्कूलच्या संचालकांना अटक

#पुणे

लष्कर भागातील रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. अरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने २० मार्चपर्यंत ’ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांच्या विरुद्ध कॉसमॉस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. अरहाना यांनी बँकेकडून कर्ज घेतले हाेते. कर्जाची परतफेड करण्यात न आल्याने बँकेकडून फसवणुकीची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर अरहाना यांनी व्यवसायात बेकायदा काळा पैसा गुंतविल्याचा संशय ‘ईडी’ला होता. ईडी’कडून या प्रकरणात समांतर तपास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पिंपरीतील सेवा विकास बँकेचे संचालक अमर मूलचंदानी आणि रोझरी स्कूलचे विनय अरहाना यांच्या मालमत्तेवर ‘ईडी’च्या पथकाने २८ जानेवारी रोजी छापे टाकले होते. त्यानंतर अरहाना यांना ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयातील पथकाने शुक्रवारी (१० मार्च) अटक केली. अरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी अरहाना यांना २० मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बँकेकडून २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. शाळेच्या नूतनीकरणासाठी कर्जाची रक्कम वापरणे अपेक्षित असताना अरहाना यांनी या रकमेचा अपहार केला. नूतनीकरणासाठी बनावट निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अरहाना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘ईडी’कडून समांतर तपास करण्यात आला होता. ‘ईडी’कडून २८ जानेवारी रोजी अरहाना यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी करण्यात आली हाेती.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story