वाघोलीत दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय

वाघोली परिसरातील एका लॉजवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:52 am
वाघोलीत दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय

वाघोलीत दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय

उबाळेनगरमधील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; बांगलादेशी तरुणींसह चौघांना अटक

#पुणे

वाघोली परिसरातील एका लॉजवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९, रा. आळंदी फाटा, लोणीकंद) आणि प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाघमारे याला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाघोली परिसरात उबाळेनगरमधील जयभवानी लॉजवर वेश्याव्यवसाय चालविण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी एक मार्च रोजी या लॉजवर छापा टाकला. या कारवाईत एका बांगलादेशी तरुणीसह पश्चिम बंगालमधील तीन तरुणींना ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार पीडित तरुणींना हडपसरमधील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.

आरोपी वाघमारे आणि पुजारी यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर, आरोपी वाघमारे याला लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story