Criminals arrested : केशवनगर परिसरात गुन्हेगारांची काढली धिंड

नशा करत असताना हटकल्याचा राग आल्याने मुंढव्यातील केशवनगर परिसरात चौघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून, डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. केशवनगर परिसरात एक टोळके एका घराजवळील गोठ्यासमोर नशा करत बसले होते. दरम्यान पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 12 May 2023
  • 08:45 am
केशवनगर परिसरात गुन्हेगारांची काढली धिंड

केशवनगर परिसरात गुन्हेगारांची काढली धिंड

नशा करताना हटकल्याने टोळक्याची सटकली; मुंढव्यात ज्येष्ठ नागरिकाची केली हत्या

#मुंढवा

नशा करत असताना हटकल्याचा राग आल्याने मुंढव्यातील केशवनगर परिसरात चौघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून, डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. केशवनगर परिसरात एक टोळके एका घराजवळील गोठ्यासमोर नशा करत बसले होते. दरम्यान पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

नशा का करता, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने या टोळक्याने एका ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. किरकोळ कारणामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागल्यामुळे पोलिसांनी या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांची परिसरातून धिंड काढली. नागनाथ पाटील, रोहित घाडगे, सनी चव्हाण अशी यातील तीन आरोपींची नावे आहेत.

रवींद्र दिगंबर गायकवाड असे हत्या झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई-म्हशींचा गोठा आहे. गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अमली पदार्थाची नशा करत बसले होते. रवींद्र गायकवाड यांनी नशा करत असलेल्या तरुणाच्या टोळक्याला हटकल्याने या टोळक्याने त्यांची दगडाने आणि कोयत्याने वार करून हत्या केली. गायकवाड यांची हत्या झाल्यानंतर मुंढवा आणि केशवनगर गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपींचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी ही हत्या केली त्या ठिकाणाहून संपूर्ण गावातून या आरोपींची धिंड काढली. दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी ही धिंड काढली होती.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story