Police checked 350 CCTV footage : सराईतासाठी तपासले ३५० सीसीटीव्ही फुटेज

'आयटी हब' हिंजवडी तसेच वाकड भागातून दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्याला अटक करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी हिंजवडी ते सुपा, अहमदनगरपर्यंत तब्बल साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सराईताला अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडी पोलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 3 Aug 2023
  • 11:23 am
सराईतासाठी तपासले  ३५० सीसीटीव्ही फुटेज

सराईतासाठी तपासले ३५० सीसीटीव्ही फुटेज

सराईत दुचाकीचोराकडून १८ दुचाकी जप्त; कागदपत्रांशिवाय विकायचा स्वस्तात दुचाकी

'आयटी हब'  हिंजवडी तसेच वाकड भागातून दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्याला अटक करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी हिंजवडी ते सुपा, अहमदनगरपर्यंत तब्बल साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सराईताला अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडी पोलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

रवी परमेश्वर धांडगे असे अटक करण्यात आलेल्या नाव आहे. तो पाथर गव्हाण (ता- पाथरी, जिल्हा- परभणी)  या ठिकाणी राहतो. तो स्थानिकांना दहा ते पंधरा हजारांत दुचाकी विकायचा, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी यावेळी दिली. आयटी हब असलेल्या हिंजवडीत आणि वाकडमध्ये दिवसा दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये एकच व्यक्ती बनावट चावीच्या साह्याने दुचाकी चोरी करत असल्याचे वारंवार पुढे आले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाणे ते सुपा यादरम्यानचे साडेतीनशे सीसीटीव्ही तपासून आरोपी रवी परमेश्वर धांडगे याच्यापर्यंत पोलीस पोहोचले.

रवी हा हिंजवडी आणि वाकड परिसरात दुचाकी चोरून तो मित्र विकास धांडगेच्या मदतीने पाथरगव्हाण येथील स्थानिकांना दहा ते पंधरा हजारांत विकायचा. दरम्यान, त्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास काही दिवसांमध्ये कागदपत्रे देतो, असे सांगायचा. रवी हा जेव्हा दुचाकी चोरायची त्याचवेळी हिंजवडी किंवा वाकड परिसरात यायचा. मग दुचाकी चोरून तो पुन्हा त्याच्या गावी निघायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी रवी परमेश्वर धांडगे याला पाथरगव्हाण ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी मारणे, धुमाळ, शिंदे, केंगले, कोळी, नरळे, चव्हाण, गडदे, बलसाने, राणे, पालवे, कांबळे, पंडित यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story