प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणीच्या मित्रावर हल्ला
# आंबेगाव पठार
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने त्याच्या मित्रासमवेत तरुणीच्या मित्रावर धारदार शस्त्राने वार केला.पुण्यातील आंबेगाव पठार या भागात घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात समर्थ परदेशीसह तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणीच्या मित्रावर हल्ला पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आराेपी समर्थ यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. परंतु वाद झाल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून तरुणीने आरोपीसोबत संबंध तोडले होते. ती आरोपीशी बोलणे टाळत होती. या गाेष्टीचा राग मनात धरून आरोपीने तिचा पाठलाग केला. ती घरासमोर पाणी भरत असताना आरोपी त्याच्या दाेन मित्रांसाेबत त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीचा हात पकडून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता तेथे आलेल्या तरुणीच्या आई आणि भावास शिवीगाळ केली. तसेच अश्लील हातवारे करून तिच्या आईच्या पोटात लाथ मारली. या घटनेनंतर तरुणीने तक्रार करण्यासाठी पोलीस चाैकीत धाव घेतली. याच वेळी आरोपी आणि त्याच्या दाेन मित्रांनी रिक्षामधून येऊन साक्षीदार सीताराम रसाळ यास मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने सीतारामच्या मानेवर वार करून त्यांना जखमी केले. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या विरोधात पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार समर्थ परदेशी आणि त्याच्या दाेन मित्रांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. घाेगरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.