सुडाने पेटला; अल्पवयीन मुलाने केला वृद्धेचा खून

घरात आल्यावर वृद्ध महिलेने सर्वांसमक्ष हाकलून दिले म्हणून १४ वर्षांच्या मुलाने संबंधित वृद्धेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून पिंपरी-चिंचवडला आलेल्या वृद्धेचा ६ जुलैला रूपीनगर, तळवडे येथे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने केलेल्या तपासातून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 13 Jul 2023
  • 12:43 am
सुडाने पेटला; अल्पवयीन मुलाने केला वृद्धेचा खून

सुडाने पेटला; अल्पवयीन मुलाने केला वृद्धेचा खून

तळवडेमधील रूपीनगरातील घटना; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने घेतले १४ वर्षांच्या मुलाला ताब्यात

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

घरात आल्यावर वृद्ध महिलेने सर्वांसमक्ष हाकलून दिले म्हणून १४ वर्षांच्या मुलाने संबंधित वृद्धेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून पिंपरी-चिंचवडला आलेल्या वृद्धेचा ६ जुलैला रूपीनगर, तळवडे येथे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने केलेल्या तपासातून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

शोभा जगन्नाथ आमटे (वय ६८, रा. राजमाता जिजाऊ हाउसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे. मूळ रा. बेरडवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय ३८, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोपट आमटे यांच्या आई त्यांच्या गावी राहत होत्या. पोपट मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात राहतात. त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले. त्यासाठी शोभा या २३ जून रोजी मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी रूपीनगर येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात काही दिवस दाखल केले होते. दवाखान्यातून घरी गाल्यावर काही दिवसांनी गावी जाणार होत्या. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. ६ जुलैला सकाळी पोपट कामासाठी बाहेर गेले. त्या वेळी शोभा घरात एकट्या होत्या. सकाळी सव्वा अकरा ते पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी घरात येऊन शोभा यांच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घातला आणि त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला.

या प्रकरणाचा समांतर तपास चिखली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एककडून केला जात होता. पोलिसांनी पोपट यांच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा खून केल्याचे कबुल केले.

ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पोपट आमटे हे मित्र आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलगा पोपट यांच्या घरी आला होता. त्या वेळी पोपट यांच्या आई शोभा यांनी त्याला धक्काबुक्की केली व अपमान करून घराबाहेर काढले होते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांसमोर व महिलांसमोर अपमान झाल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने शोभा या घरात एकट्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून त्यांचा खून केल्याचे कबूल केले.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील, साहाय्यक फौजदार शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे आदींच्या पथकाने सहा दिवस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणातून हा तपास केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story