देशात बॉम्बस्फोट अन् पंतप्रधानांना ठार मारणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहे, असा मेल एका संकेतस्थळ चालकास पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेल मिळालेल्या व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिसांनी त्वरित मेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 10 Aug 2023
  • 11:27 am
देशात बॉम्बस्फोट अन् पंतप्रधानांना ठार मारणार?

देशात बॉम्बस्फोट अन् पंतप्रधानांना ठार मारणार?

भूगाव येथील एका व्यक्तीला ईमेलद्वारे धमकी; ईमेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहे, असा मेल एका संकेतस्थळ चालकास पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेल मिळालेल्या व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिसांनी त्वरित मेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भारतात मोठा बॉम्ब ब्लास्ट करण्याची त्यासोबत हिंदू धर्म आणि हिंदू महिलांना उद्ध्वस्त करण्याचा संदेश त्या धमकीमध्ये नमूद करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार त्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर याची गंभीर दखल घेत त्या संदर्भात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूगाव परिसरातील राहुल दुधाणे ‘हिंदूजम फॅक्टस’ संकेतस्थळ चालवतात. मुलाला बरे वाटत नाही म्हणून ते एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असताना, त्यांना हा मेल आला. ज्यामध्ये नमूद केले होते की, मी भारतात एका खतरनाक बॉम्बस्फोटाचे प्लॅनिंग करत आहे. मी दहशतवादी संघटनांना फंडिंग करत आहे. मी हिंदू महिला आणि हिंदू धर्माला संपवणार आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार आहे, असा संदेश त्यात होता. संकेतस्थळावर एम. एम. मोखिम नावाच्या व्यक्तीकडून तसेच एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरूनही असाच मेसेज आला होता.  या प्रकरणी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा यांनी सांगितले की, संबंधित तक्रारदार हे भूगाव येथे राहणारे असून ते सदरचे संकेतस्थळ चालवतात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे ते उपचारासाठी आलेले होते. त्यावेळी ते संबंधित संकेतस्थळ पाहात असताना, त्यांना एका बातमीच्या कमेंटमध्ये सदरचा मेसेज आढळून आला आहे. सदर हॉस्पिटल हे अलंकार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने, तक्रारदार यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर अलंकार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story