Pavana river : ‘पवना नदीत गढूळ पाणी येत असल्याने पाणी उकळून घ्यावे’

पवना नदीत सध्या गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 3 Aug 2023
  • 11:15 am
‘पवना नदीत गढूळ पाणी येत असल्याने पाणी उकळून घ्यावे’

‘पवना नदीत गढूळ पाणी येत असल्याने पाणी उकळून घ्यावे’

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पवना नदीत सध्या गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये वितरित केले जाते.

सध्या पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पवना नदीत गढूळ पाणी येत आहे. हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तथापि, खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील विविध हाऊसिंग सोसायटीच्या व्हॉट्स प ग्रुपवर देखील याबाबतचा आदेश व्हायरल करून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती करून देण्याबाबतच्या सूचना संबंधितांना महापालिकेने केल्या आहेत. दूषित पाणी पिऊन साथीचे आजार वाढण्याचा धोका लक्षात घेता महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांशी संपर्क करून पाण्याबाबत सतर्कतेचे सूचना करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story