रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर
#पुणे
रसिकशेठ धारिवाल हे त्यांच्या सामाजिक कार्याने अजरामर आहेत. त्यांनी सदैव तळागाळातील तसेच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला. उद्योग व्यवसायातून उच्च शिखरावर पोहचूनसुद्धा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. शहरी व ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांची उभारणी असो, वा पर्यावरणविषयक, आरोग्यविषयक प्रकल्पांची उभारणी असो, आपला उपयोग समाजाला कसा होईल, याचाच विचार ते नेहमी करीत, अशी माहिती आरएमडी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी दिली.
श्री रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे १ मार्च २०२३ रोजी माणिकचंद हाऊस, बंगला नंबर ६४, लेन नं. ३, कोरेगाव पार्क, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरवासीयांनी रक्तदान करण्यास जरूर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.