IPL सामन्यांवर सट्टेबाजी, एकाला अटक

पिंपरी चिंचवडमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. लघू मोहनदास राखवानी (३८, रा. मीनाक्षी सोसायटी, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 05:09 pm
PuneMirror

IPL सामन्यांवर सट्टेबाजी, एकाला अटक

६ मोबाईल आणि १ लाख ८० हजाराचे सामान जप्त

पिंपरी चिंचवडमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. लघू मोहनदास राखवानी (३८, रा. मीनाक्षी सोसायटी, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पोलिसांनी ६ मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच पोलिसांना १ लाख ८० हजार ५०० रुपये किमतीचे सट्टेबाजीशी संबंधित साधन सापडले आहे.

पोलिसांना आरोपीच्या राहत्या घरी सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. त्यानंतर आरोपी लघू ताब्यात घेतले. तपासादरम्यान तो आयपीएल सामन्यांवर सट्टा स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीचा यापूर्वीचा कोणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नसल्याचे समोर आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story