फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्यादरम्यान मारहाण

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:14 am
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्यादरम्यान मारहाण

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल सामन्यादरम्यान मारहाण

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फुटबॉल सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी मारहाण केल्याची घटना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर घडली. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात वीरेंद्र महेंद्र परदेशी (वय २२, रा. सहकारनगर) याने फिर्याद दिली. त्यानुसार अर्णव लोणकर, अभिषेक सिंग आणि सारंग डोनाडकर यांच्यासह इतर ११ जणांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३० मार्च रोजी दुपारी फुटबॉल सामन्यातील उपांत्यफेरी सुरू होती. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघासोबत सुरू असलेल्या या सामन्यात चेंडू घेण्यावरून दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी परदेशी याच्या संघातील खेळाडूंना शिवीगाळ केली. त्यावर लोणकर, सिंग, डोनाडकर आणि इतर ११ खेळाडूंनी परदेशी याच्यासह मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story