Be careful, be alert : सावध राहा, सतर्क राहा!

पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात अनेक उत्साही पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही लोक आपआपल्या ग्रूप्ससोबत, तर काही अगदी एकट्यानेच रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 11 May 2023
  • 01:15 pm
सावध राहा, सतर्क राहा!

सावध राहा, सतर्क राहा!

पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात अनेक उत्साही पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही लोक आपआपल्या ग्रूप्ससोबत, तर काही अगदी एकट्यानेच रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.

उंड्री चौकातही पुणेकरांनी त्यांच्या सजगतेचे उत्तम दर्शन घडवले. ते रस्त्यावरील वाहनचालकांना वाहतूक नियमनाचे धडे देत होते.उपक्रमात सहभागी झालेले कार्यकर्ते इतरांना वाहनांचा वेग कमी ठेवा, सिग्नल पाळा अशा सूचना अत्यंत तळमळीमने करत होते.  उपक्रमात सहभागी झालेले सजग नागरिक वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यात मदत करत होते आणि वाहतूक पोलिसांकडून नियमनाचे धडेही घेत होते. सुरक्षा आणि सतर्कता सर्वांसाठीच महत्त्वाची असल्याचे मत सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केले.

'जरा देख के चलो' उपक्रम ग्रॅव्हिटस फाऊंडेशनच्या साहाय्याने राबवण्यात येत असून, द माईल्स पुणे व सेलेबॅलिटी यांचे सहकार्य लाभले आहे. न्याती ग्रूपच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि शिवतारा प्रॉपर्टीज यांनी या उपक्रमास पाठिंबा दिला आहे. कुश चतुर्वेदी 'नॉलेज पार्टनर' आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story