मांगूरनंतर आता 'हेलिकॉप्टर'ने वाढवला ताप

उजनी धरणामध्ये दिसायला आकर्षक असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात सापडणाऱ्या 'हेलिकॉप्टर माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तर अमेरिकेतील हा मासा शोभेच्या टॅंकमधून उजनीत आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. खाण्यास अयोग्य व विषारी असणाऱ्या या माशामुळे देशी माशांवर आणखी एक वाढीव संकट कोसळले आहे, असा अंदाज प्राणिशास्त्र अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Mar 2023
  • 12:16 pm
मांगूरनंतर आता 'हेलिकॉप्टर'ने वाढवला ताप

मांगूरनंतर आता 'हेलिकॉप्टर'ने वाढवला ताप

उजनी धरणातील आकर्षक, निरूपयोगी माशांमुळे इतर मत्स्यजाती धोक्यात; जाळे तोडत असल्याने मच्छिमारांचे नुकसान

उजनी धरणामध्ये दिसायला आकर्षक असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात सापडणाऱ्या 'हेलिकॉप्टर माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उत्तर अमेरिकेतील हा मासा शोभेच्या टॅंकमधून उजनीत आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. खाण्यास अयोग्य व विषारी असणाऱ्या या माशामुळे देशी माशांवर आणखी एक वाढीव संकट कोसळले आहे, असा अंदाज प्राणिशास्त्र अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे.

खरपा (हेलिकॉप्टर), सकर मासा, सेलफिन फिश यांसारख्या नावाने परिचित असलेला हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर मच्छिमारांचे नुकसान करतो. गेल्या काही वर्षांपासून उजनीवरील मच्छिमारांना क्वचित प्रमाणात जाळ्यात 'हेलिकॉप्टर' मासा अडकला जात असे. मात्र, अलीकडच्या काळात तो जाळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. हा मासा हजारो रुपये किमतीची जाळी फाडल्याशिवाय बाहेर पडत नाही. यामुळे मच्छिमारांना नेहमीच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

शरीरावर आकर्षक नक्षीदार खवले असलेल्या या माशाला स्थानिक 'खरपा' मासा या नावानेही ओळखतात. मागणी नसली तरी तो पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी घेतात. मासळीखत तयार करण्यासाठी या माशांचा उपयोग केला जातो, असे एका मच्छिमाराने 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.

वेगळा आकार व रंगामुळे हा मासा शोभिवंत मासा म्हणून फिशटँकमध्ये वापरला जातो. या माशाचे जगभरात शंभरच्या आसपास प्रकार सापडतात व विविध १७ देशांत हा मासा शोभिवंत मासा म्हणून आयात केला गेला आहे. साधारणतः  १० ते १५ वर्षे आयुष्यमान असणारा हा मासा मिश्र आहारी असून तो पाण्यातील शेवाळ, लहान मासे व इतर माशांची अंडी देखील खातो. या माशाचे तोंड गोलाकार असून मत्स्यवर्गातील “कॅटफिश’ वर्गात मोडतो व  १५ ते २० सें. मी. लांबीचा झाल्यावर प्रजननायोग्य होतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story