शिवसैनिकांनी मारले सावंतांच्या फोटोला जोडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुणे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:15 am
शिवसैनिकांनी मारले सावंतांच्या फोटोला जोडे

शिवसैनिकांनी मारले सावंतांच्या फोटोला जोडे

मुख्यमंत्र्यांना रिक्षावाला संबोधल्याबद्दल व्यक्त केला निषेध

#लोकमान्य टिळक चौक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुणे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

पुणे शिवसेनेच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात (अलका टाॅकीज) हे आंदोलन करण्यात आले. अरविंद सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान सावंत यांच्या छायाचित्राला जोडे मारले, काळे फासण्यात आले. याशिवाय अरविंद सावंत यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा उल्लेख रिक्षावाला असा केला होता.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले, याचा खुलासा करताना सावंतांनी घडलेली एक घटना सांगितली. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा पर्याय नाकारला. शिंदे यांच्या नावाचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला होता. त्यावर पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये दोन-दोन माजी मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत, छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार हे नेते या रिक्षावाल्याच्या हाताखाली कसे काम करतील? याच्या हाताखाली तुम्ही कसे काम करणार, अशी विचारणा पवारांनी केली असल्याचे सावंत म्हणाले. मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेच हवेत, असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता, पण त्यानंतर शरद पवारांनी गळ घातली. हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावे लागेल. आपण काय रणांगणातून पळणारे नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचा शब्द मान्य करत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली, असेही सावंत म्हणाले.

दरम्यान, सावंत यांनी िशंदे यांच्याबद्दलचे वक्तव्य शरद पवारांचे नसून आपणच तसे म्हणाल्याचे स्पष्ट केले.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story