Gautami Patil : गौतमीचा ‘तो’ व्हीडीओ व्हायरल करणारा अटकेत

गौतमी पाटील हे नाव मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. अश्लील हावभावांसह कर्त्याचे कार्यक्रम केल्याने अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या गौतमीचा कपडे बदलतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 4 May 2023
  • 03:54 am
गौतमीचा ‘तो’ व्हीडीओ व्हायरल करणारा अटकेत

गौतमीचा ‘तो’ व्हीडीओ व्हायरल करणारा अटकेत

अहमदनगर येथील एका अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

#पुणे

गौतमी पाटील हे नाव मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. अश्लील हावभावांसह कर्त्याचे कार्यक्रम केल्याने अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या  गौतमीचा कपडे बदलतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.  

गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेण्यात आले. गौतमीने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. २४ फेब्रुवारीला पुण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हीडीओ कोणीतरी शूट करून व्हायरल केला. हा  व्हीडीओ गौतमीपर्यंत पोहोचताच मग तिच्याच ग्रुपमधील एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हीडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्हीडीओ व्हायरल करणाऱ्यांची कानउघडणी केली होती. तुमचे काही जात नाही पण मला लोक बोलतात, तुमच्याही घरी, आई- बहिणी असतील ना, मग हे असे काम करताना त्यांचा विचार मनात आला नाही का? असा प्रश्न गौतमीने केला होता. शिवाय हा व्हीडीओ आपण सर्वात आधी आपल्या आईला पाठवून तिला कल्पना दिली होती, असेही गौतमीने सांगितले आहे.  गौतमी पाटील आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप वारंवार होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story