भरतीला सोडायला आलेल्या बापाचा अपघाती मृत्यू

पुण्यात मागील काही महिन्यांपासून अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अपघाताने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. आपल्या लाडक्या लेकीचे पोलीस व्हायचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पुण्यातील भरतीसाठी घेऊन आलेल्या एका वडिलांवर सोमवारी काळाने घाला घातला. या अपघातात सुरेश सखाराम गवळी (वय ५५ वर्षे ) यांचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 11:27 am
भरतीला सोडायला आलेल्या बापाचा अपघाती मृत्यू

भरतीला सोडायला आलेल्या बापाचा अपघाती मृत्यू

लेकीला वर्दीत बघायचे स्वप्न अपुरे; चहासाठी जाताना भरधाव वाहनाने उडवले

#शिवाजीनगर

पुण्यात मागील काही महिन्यांपासून अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अपघाताने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. आपल्या लाडक्या लेकीचे पोलीस व्हायचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पुण्यातील भरतीसाठी घेऊन आलेल्या एका वडिलांवर सोमवारी काळाने घाला घातला. या अपघातात सुरेश सखाराम गवळी (वय ५५ वर्षे ) यांचा मृत्यू झाला आहे.

सुरेश सखाराम गवळी यांचे लेकीला पोलीस बनवायचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांची लेक पोलीस भरतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर  लेकीला सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी नाशिकहून पुण्याला घेऊन आले. काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील पदपथावर मुक्काम केला. पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून हे सुरेश गवळी निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवले आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेसंदर्भातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनाचा शोध घेतल्यानंतर आरोपीचा शोध घेणार आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story