अपघात की हृदयविकाराचा धक्का ?

वेल्हे तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास घडली. तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू टिमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून शवविच्छेदनानंतर अंतरिम अहवालात मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खोल दरीत पडून मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 11:47 am
अपघात की हृदयविकाराचा धक्का ?

अपघात की हृदयविकाराचा धक्का ?

पनवेलच्या ज्येष्ठ ट्रेकरचा लिंगाणा किल्ल्याच्या दरीत पडून मृत्यू

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

वेल्हे तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास घडली. तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू टिमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून शवविच्छेदनानंतर अंतरिम अहवालात मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खोल दरीत पडून मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

अजय बबनराव काळे (वय ६२) राहणार बी/४०२ नीलकंठ गार्डन सोसायटी, जुने पनवेल, जिल्हा रायगड असे या ज्येष्ठ पर्यटकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आशुतोष काळे यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला आहे. अजय काळे यांना ट्रेकिंगची आवड असल्याने त्यांनी अनेक लहान-मोठे ट्रेक केले होते. रविवारी पुणे येथील सह्याद्री ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट या संस्थेतील मित्रांसोबत घरातून निघाल्यानंतर सोमवारी (ता. २७) सकाळी ते किल्ले लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचले.

लिंगाणा किल्ला हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आहे. परंतु किल्ल्याकडे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून सिंगापूरमार्गे रस्ता आहे. ट्रेक सुरू असतानाच काळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या हातात असलेले स्मार्ट वॉच त्यांचे बिघडलेले हृदयाचे ठोके व रक्तदाब दाखवत होते, परंतु दुर्गम मार्ग असल्याने कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. सोबत असलेल्या मेडिकल किटने उपचार करणे शक्य नव्हते. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सोबत असलेल्या ट्रेकर्सनी दिली. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळे हे खोल दरीत कोसळल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.

खडतर रस्ता, रात्रीचा अंधार यामुळे एरव्ही साधे चालणेही मुश्कील असलेल्या डोंगर-दऱ्याच्या वाटेवरून रोपव्दारे बनवलेल्या स्ट्रेचरवरून मृतदेह आणणे हे जिकीरीचे होते. त्यानंतर जवळजवळ ११ तास रेस्क्यू मोहीम राबवून मंगळवारी (२८ मार्च) पहाटे ३ वाजता मृतदेह मोहरी गावात आणण्यात यश आले. वेल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. के. कदम म्हणाले, काळे यांना वेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला 

असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी घोषित केले. आम्ही अधिक तपास करीत आहोत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story