कुरिअरने पाठवली गर्भपाताची गोळी

लग्नाच्या आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीच्या गर्भपातासाठी गुलबर्गा येथून कुरिअरने गोळी पाठविणाऱ्या तरुणावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 01:00 pm
कुरिअरने पाठवली गर्भपाताची गोळी

कुरिअरने पाठवली गर्भपाताची गोळी

गुलबर्गा येथून चिंचवडमधील अल्पवयीन मुलीला गोळी पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

लग्नाच्या आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरुणीच्या गर्भपातासाठी गुलबर्गा येथून कुरिअरने गोळी पाठविणाऱ्या तरुणावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तम जगदेव चिने (वय २०, रा. हळकुंदा, गुलबर्गा, कर्नाटक) याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षीय पीडितेच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडिता ऑक्टोबर २०२२ मध्ये तिच्या मावशीकडे गुलबर्गा येथे गेली होती. तेव्हा तिथे उत्तमने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तेथील एका बगिच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या घटनेनंतर पीडिता काही दिवसांनी आपल्या घरी पिंपरी-चिंचवडमध्ये परतली. दरम्यान,  गर्भवती राहिल्याने तिने ही बाब उत्तमला कळविली. उत्तमने तिला गर्भपात करण्यास सांगितले. तसेच यासाठी त्याने गर्भपाताची गोळी कुरिअरद्वारे चिंचवडला पाठविली.

पीडितेने ही गोळी घेतल्यावर तिचा गर्भपात झाला. मात्र, याचा त्रास होऊ लागल्याने तिला घरच्यांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यावर तिच्या कुटुंबीयांकडे गर्भपाताची विचारणा करून, याबाबत पोलिसांना माहिती कळविली.

त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. मात्र, त्यांना याबाबत काही माहिती नसल्याचे उघड झाले. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन गर्भवती कोणामुळे राहिली आणि अवैध प्रकारे गोळी कुठून आणली याची विचारणा केली. त्यानंतर पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार उत्तवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा गुलबर्गा येथे वर्ग केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story