फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

एका तरुणीसोबतचे खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गुणवडी येथील एका तरुणाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड झालेल्या या प्रकारामुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:17 am
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

विवाहाचे आमिष दाखवत तरुणीची फसवणूक

#बारामती

एका तरुणीसोबतचे खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गुणवडी येथील एका तरुणाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड झालेल्या या प्रकारामुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी ही २२ वर्षांची आहे. ही तरुणी आणि आरोपी सोहम भोई (रा. गुणवडी, तालुका- बारामती) या दोघांची २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांच्यामध्ये शरीरसंबंध आले. यानंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवू लागला होता, असे दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तरुणी विवाहाबाबत विचारणा करत असे, त्यावेळी सोहम तिला उडवाउडवीची उत्तरे देत होता.  

दरम्यान ३१ मार्च रोजी ही तरुणी आरोपी सोहम भोई याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र तरुणीचा हा विचार ऐकल्यानंतर सोहमला प्रचंड राग आला. सोहम याने या तरुणीला गाडीवर बसवून मेडद या ठिकाणी नेले. तेथे सोहमची आई, बहीण, वडील व मित्र वैभव यांनी तिला मारहाण केली. ‘सोहमचा नाद सोड’ अशी धमकीही त्यांनी पीडित तरुणीला दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ही तरुणी हताश झाली. यानंतर हताश झालेल्या या पीडित तरुणीने पोलिसात तक्रार करण्याचे मनाशी पक्के केले. त्यानंतर तिने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. यानंतर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story