नाना पेठेत तरुणावर धारदार शस्त्राने वार

सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:59 pm
नाना पेठेत तरुणावर धारदार शस्त्राने वार

नाना पेठेत तरुणावर धारदार शस्त्राने वार

सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्याच्या वादातून टोळक्याचे कृत्य

#नाना पेठ

सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महंमद जुबेर मेहंदी हसन शेख (वय २७, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नावे आहे. शेखने या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शादाब शाहीद शेख (वय २६, रा. तांबोळी गल्ली, डायस प्लॉट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमद शेख नाना पेठेतील एसएस कार डेकोर येथे कामगार म्हणून काम करतो. त्याच्या दुकानाच्या शेजारी रुबी मोटर्स या दुकानात आरोपी शादाब शेख हा कामगार आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. शादाब आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी महंमदवर धारदार शस्त्राने वार केले. टोळक्याने एसएस कार डेकोर दुकानातील सामानाची तोडफोड करून ४० हजार रुपयांचे नुकसान केले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story