Junnar : गावठी कट्टा बाळगणाऱ्या जुन्नरच्या तरुणास अटक

कांदळी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या जुन्नर येथील तरुणास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल, बुलेट मोटरसायकल असा दोन लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 4 May 2023
  • 03:59 am
गावठी कट्टा बाळगणाऱ्या जुन्नरच्या तरुणास अटक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या जुन्नरच्या तरुणास अटक

पोलिसांनी घातल्या बेड्या; सव्वा दोन लाखांचा मुद्देमालही घेतला ताब्यात

#नारायणगाव

कांदळी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रासमोर गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या जुन्नर येथील तरुणास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल, बुलेट मोटरसायकल असा दोन लाख तीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे .या प्रकरणी सागर अरुण चौगुले (वय २८, रा. शुक्रवार पेठ, जुन्नर) याला अटक केली आहे.

ताटे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,  कांदळी येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कलाकेंद्राच्या  समोर एक तरुण गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता खाकी रंग असलेल्या बुलेट मोटरसायकलवर एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे मॅक्झिन असलेले पिस्तूल आढळून आले.  या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली. पुढिल तपास तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली . दरम्यान ग्रामीण भागात देशी-विदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी पोलिसांनी सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story