अभियंता तरुणीवर प्रियकराने केले अत्याचार

डेटिंग ॲॅपवरून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या अभियंता तरुणीवर प्रियकर आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस किरण सौदणकर वय (२४, रा. बी ३०६, मंत्राई सेन्स सोसायटी, उंड्री पिसोळी लिंक रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत मारहाण करून तिचा डोळा फोडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:16 am
अभियंता तरुणीवर प्रियकराने केले अत्याचार

अभियंता तरुणीवर प्रियकराने केले अत्याचार

घरच्यांकडे पैशांची मागणी करण्यासाठी केली गंभीर मारहाण; टिंडर डेटिंग ॲॅपवरून झाली होती युवकाशी ओळख

#पिंपरी

डेटिंग ॲॅपवरून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या अभियंता तरुणीवर प्रियकर आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस किरण सौदणकर वय (२४, रा. बी ३०६, मंत्राई सेन्स सोसायटी, उंड्री पिसोळी लिंक रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत मारहाण करून तिचा डोळा फोडला. गळ्याला चाकू लावून तिच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिला घरात डांबून ठेवले. हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२२ ते रविवार २ एप्रिल २०२३ पर्यंत लक्ष्मी चौक हिंजवडीत घडला.

पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची बिहारची असून २०१७ पासून पुण्यात राहात आहे. ती हिंजवडी आयटीमध्ये अभियंता आहे. आरोपी आणि फिर्यादी तरुणीची टिंडर डेटिंग ॲॅपवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये ओळख झाली होती. दोघांची पहिल्यांदा मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तरुणी लग्नास होकार देत नसल्याने आरोपी तिला त्याच्या सदनिकेवर घेऊन अत्याचार करत होता. प्रियकर तेजस याचे आणखी एका दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा फिर्यादीला जानेवारी महिन्यात संशय आला. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. आरोपी तेजसने फिर्यादी अभियंता तरुणीला मारहाण केली. तिचा डोळा फोडला. तिच्या डोक्याला मारहाण झाली आहे. फिर्यादीला सतत मारहाण केली जात होती. शिवीगाळ करत तरुणीच्या गळ्याला चाकू लावला. तिच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या घरात तिला डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास 

करत आहेत.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story