रील्सच्या नादात घेतला महिलेचा बळी

मोहम्मदवाडी येथील कृष्णानगर परिसरातील पालखी रोडवर रिल्स बनवण्याच्या नादात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, रील्स तयार करणार्‍या दोघा आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. तसलीम फिरोज पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. आयान शेख आणि झाईद शेख या दोन आरोपींना (अंदाजे वय २० ते २२ रा.सय्यदनगर) अटक करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 12:49 pm
रील्सच्या नादात घेतला महिलेचा बळी

रील्सच्या नादात घेतला महिलेचा बळी

व्हीडीओ करताना दुचाकीला दिली धडक; वानवडी पोलिसांनी केली दोघांना अटक

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

मोहम्मदवाडी येथील कृष्णानगर परिसरातील पालखी रोडवर रिल्स बनवण्याच्या नादात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, रील्स तयार करणार्‍या दोघा आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. तसलीम फिरोज पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. आयान शेख आणि झाईद शेख या दोन आरोपींना (अंदाजे वय २० ते २२ रा.सय्यदनगर) अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान शेख आणि झाईद शेख हे दोघे तरुण मोहम्मदवाडी येथील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी चालवत रिल्स तयार करत होते. ते दुचाकी वेगाने चालवत होते. त्यादरम्यान तसलीम फिरोज पठाण ही महिला दुचाकीवरून घरी जात होती. तेवढ्यात तसलीम यांच्या दुचाकीला आयान शेख आणि झाईद शेख यांच्या पल्सर या दुचाकीने जोरात धडक दिली. या घटनेत तसलीम यांच्या डोक्याला जोरात मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झाईद हे दोघेही बाईकवर स्टंट करत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रील्स बनवत होते. यावेळी तस्लिमा पठाण या रस्त्यावर दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी आयान शेख हा बाईक चालवत रील्स बनवण्यासाठी स्टंट करत होता तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हीडीओ काढत होता. दरम्यान, यावेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर पठाण या खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यु झाला. हा प्रकार घडताच त्या दोघांनीही तिथून पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सोशल मिडियावर रील्स बनवण्यासाठी हे दोघेही तिथे आले असता ही घटना घडली असल्याने त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. पण आयान शेख आणि झाईद शेख या दोघा आरोपींना काही तासांत पकडण्यात यश आल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले. तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरु झाला. पठाण यांना काेणतीही वैद्यकीय मदत न करता तसेच याबाबत पाेलिसांना न कळवता हे दोघेही अपघाताच्या ठिकाणावरून त्यांच्या माेटारसायकलसह पळून गेले. त्यामुळे पाेलिसांनी याप्रकरणी आराेपींवर भांदवि कलम ३०४ (अ ), ३३६, २७९, ४२७ आणि  माेटार वाहन अधिनियम कलम १३१ (१) १३२(१) , १३३, १३४, आणि १८४  नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वानवडी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक जयवंत जाधव यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story