बिडकर यांच्याकडे मागितली २५ लाखांची खंडणी

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे कोथरुड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:47 am
बिडकर यांच्याकडे मागितली २५ लाखांची खंडणी

बिडकर यांच्याकडे मागितली २५ लाखांची खंडणी

दोन दिवसांपूर्वी मोहोळ यांच्या नावाने मागण्यात आली होती खंडणी

#कसबा

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे कोथरुड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.

खंडणी प्रकरणी गणेश बिडकर (वय ५०, रा. सोमवार पेठ) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिडकर गुरुवारी (३० मार्च) श्री रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या एका शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्याच वेळी बिडकर यांच्या मोबाइल क्रमांकावर एक व्हाॅट्सॲप काॅल आला. कॉल करणाऱ्याने बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली.

बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार रामनवमी उत्सवात ते सहभागी असताना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल केला. या वेळी कॉल करणाऱ्याने त्यांना मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. "लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशा भाषेत त्याने खंडणी मागितली.

पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू असे देखील या अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मात्र बिडकर यांच्याकडे थेट खंडणी मागण्यात आली आहे. 

हा कॉल अनोळखी नंबरवरुन आला होता. नेमक्या कोणत्या कारणातून खंडणी मागण्यात आली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story