पोलिसांच्या पाठीवर थाप कौतुकाची !
दिघी- आळंदी रोडवर वास्तव्यास असलेले रमेश पटनाईक यांनी ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिररने’ पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने चालू केलेल्या ‘जरा देख के चलो’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमात भाग घेतला तेव्हा ते काही एकटे नव्हते. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी भक्ती याही हिरीरिने सहभागी झाल्या होत्या. पीएमआय पुणे डेक्कन इंडिया, पाणी फाऊंडेशनसारख्या विविध समाजसेवी संघटनांसमवेत काम करणारे पटनाईक दाम्पत्य आपल्या कृतीने समाजात काही तरी बदल घडवून आणण्यासाठी सतत धडपडत असतात. शास्त्री चौकात वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले, तेव्हाही त्यांच्या मनात हाच सकारात्मक विचार होता.
शहर वाहतूक पोलीस करत असलेल्या कामाबद्दल मला नेहमी भीतीयुक्त आश्चर्य वाटायचे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा वाहतूक पोलीस आणि मदतनीस मार्शल सहकाऱ्यांसमवेत काम करण्याची संधी साधायची असे आपण ठरवले होते. रमेश पटनाईक म्हणतात की, माझ्या गाडीत बसून मी दररोज या चौकातून पुढे जातो. मात्र, वाहतूक नियंत्रित करण्याचे काम किती जटील आहे, याची मला कधी किंचितही कल्पना आली नव्हती. त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘सीविक मिरर’, ‘पुणे टाइम्स मिरर‘ चा मी मनापासून आभारी आहे. पुन्हा वेळ आणि संधी उपलब्ध झाली तर असे काम करण्यास मला नक्कीच आवडेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.