पुण्यात आठ वर्षे राहणाऱ्या पािकस्तानी तरुणास अटक

पुण्यात आठ वर्षे बेकायदा राहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे त्याचे नाव आहे. त्याने खोटी कागपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट बनवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:47 am
पुण्यात आठ वर्षे राहणाऱ्या पािकस्तानी तरुणास अटक

पुण्यात आठ वर्षे राहणाऱ्या पािकस्तानी तरुणास अटक

खोट्या कागदपत्राद्वारे केला होता पासपोर्ट तयार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुण्यात आठ वर्षे बेकायदा राहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे त्याचे नाव आहे. त्याने खोटी कागपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट बनवला आहे.  

अन्सारी कडून पासपोर्ट जप्त केला आहे. तो कोणत्या उद्देशाने पुण्यात वास्तव्य करत होता, याचा तपास पोलीस करत आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

अन्सारीच्या बेकायदा वास्तव्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलिस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे. तपासात अन्सारी भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक येथे असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेतले आहे. 

महम्मद अन्सारी याची आई ही भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी निकाह झाला होता. लग्नानंतर त्या पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने आई सध्या संयुक्त अरब अमिराती मध्ये राहत आहे. तेथील वास्तव्य हे महागडे असल्याने अन्सारीच्या शिक्षणाचा खर्च आईस परवडत नव्हता. त्यामुळे अन्सारीच्या आईने त्याला शिक्षणासाठी २०१५ मध्ये पुण्याला आपली आई, भावाकडे पाठवले. पुण्यात तो शिक्षण घेत असताना त्याने आपला पाकिस्तानाता जन्म असल्याचे लपवून ठेवले. त्याने येथील खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला असल्याचे पोलीस उपायुक्त डी राजा यांनी सांगितले आहे. अन्सारीने दुबई ते पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. अन्सारी एवढी वर्षे पुण्यात नेमके काय करत होता, त्याने या काळात काय केले याचा तपास पोलीस निरीक्षक राजेश तटकरे करत आहेत. 

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ हा  १९४६चा कायदा आहे. भारताचे नागरिकत्व नसलेल्या परदेशी व्यक्तीसाठीचे नियम आहेत. त्यांचा भारतातील प्रवास, वास्तव्य, पासपोर्ट आदीचे नियम या आहेत. यामध्ये ठराविक गोष्टींसाठीच पासपोर्ट देण्यात येतो. उदा. फिरण्यासाठी, व्यापारासाठी. पासपोर्ट धारकास उद्देशानुसार ठरलेल्या काळात वास्तव्य करता येते. जेथे राहतो तेथील नियम, कायदे, पाळणे बंधनकारक असते. त्याचे उल्लंघन केल्यास  वेगवेगळ्या शिक्षा होऊ शकतात.

बांगलादेशीस जुन्या सांगवीत अटक 

पिंपरी: पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशीला जुनी सांगवी येथे अटक करण्यात आली आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे  आधारकार्ड, मतदान कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले आहे. 

कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५, रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, मूळ – रतनपूर, वीरामपुरथाना, जि. दिनाजपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रफुल्ल शेंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कालीपाडा हा मूळचा बांगलादेशचा आहे. त्याची पारपत्र आणि व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील त्याने भारतात वास्तव्य केले. हा प्रकार पिंपरी –चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या निदर्शनास आला. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story