पिंपरीत विवाहित पुरुषाने केला मनोरुग्ण युवतीवर बलात्कार
# निगडी
मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडली.
या प्रकरणी तरुणीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक नानाभाऊ होरे (वय ३५) याला अटक केली आहे. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीचा विश्वास संपादन करून, ती मनोरुग्ण असल्याचे माहीत असूनदेखील आरोपी माणिक याने तिच्याशी जवळीक साधली. गोड बोलून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादी व त्यांच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला त्याच्या पत्नीने साथ दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
feedback@civicmirror.in