सोन्याचे आमिष दाखवून महिलांना गंडा घालणा-या टोळीला अटक

पुणे - दागिने असलेल्या वृद्ध महिलेला हेरून त्यांना सोन्याचे बिस्कीट, चिप, वेढणीचे आमिष दाखवायचे. त्यानंतर वेढणी तोडता येणार नसल्याने अंगावरचे सोन्याचे दागिने मागत पोबारा करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांनी केलेले दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Mar 2023
  • 05:46 pm
सोन्याचे आमिष दाखवून महिलांना गंडा घालणा-या टोळीला अटक

सोन्याचे आमिष दाखवून महिलांना गंडा घालणा-या टोळीला अटक

पाच आरोपींना अटक, साडेबारा लाखांचा माल जप्त

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुणे - दागिने असलेल्या वृद्ध महिलेला हेरून त्यांना सोन्याचे बिस्कीट, चिप, वेढणीचे आमिष दाखवायचे. त्यानंतर वेढणी तोडता येणार नसल्याने अंगावरचे सोन्याचे दागिने मागत पोबारा करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांनी केलेले दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

हडपसर परिसरात ज्येष्ठ महिलांना पाहून त्यांना सोन्याचे बिस्कीट, वेढणी किंवा चिप दाखवत त्यांना हे सोने सापडले असे भासवून त्यांच्या जवळचे दागिने काढून घेतले. सापडलेले सोने  वाटून घेऊ असे सांगत हा सगळा प्रकार अचानक होत असल्याने स्वतःचे अंगावरील दागिन्यापेक्षा सापडलेले दागिन्यांच्या मोहात वृद्ध महिला पडते आणि आपले दागिने त्यांच्याकडे सोपवते. नंतर हे लोक पोबारा करतात. पुणे शहरात भारती विद्यापीठात दोन तर भोसरी १ असे  १० गुन्हे दाखल झालेले आहेत.

गुन्ह्यांतील आरोपी बीड जिल्ह्यातील असून ते  पुणे शहर, चाकण, जेजुरी येथे ४ ते ५ दिवस मुक्काम करत. गुन्हा करून ते परत बीडला जात होते. हडपसर पोलीस स्टेशनचे पो. उप-निरीक्षक अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक बीडला पाठविण्यात आले. त्यांनी आरोपींच्या वाहनाचा प्रकार व बनावट नंबर प्राप्त मिळवला. तसेच आरोपी पुण्यात असल्याची  माहिती प्राप्त केली. त्यानंतर पोलिसांनी गणेश विनायक गायकवाड, रमेश विनायक गायकवाड, बंडू लक्ष्मण जाधव, हरिभाऊ मोहन कासुळे यांना विश्रांतवाडी येथून ताब्यात घेतले.

या  आरोपींनी हडपसर गाडीतळ, कात्रज बस डेपो, भोसरी बस डेपो, चाकण बस डेपो या ठिकाणी मागील दोन वर्षांपासून वेळोवेळी गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा साथीदार महादेव आसाराम जाधव यासही अटक करण्यात आली आहे.

या आरोपींनी दोन वर्षांच्या कालावधीत केलेल्या एकूण २४ पेक्षा अधिक घटनांची माहिती दिली असून त्यापैकी हडपसर पोलीस ठाणे येथील ७ गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १२८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, मोबाईल हँडसेट असा  १२ लाख ४४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे हे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story