चार वर्षीय मुलीला आईनेच भोसकले

क्रौर्याची परिसीमा गाठत एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरात सोमवारी (२७ मार्च) रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 01:07 pm
चार वर्षीय मुलीला आईनेच भोसकले

चार वर्षीय मुलीला आईनेच भोसकले

ससाणेनगरमध्ये गाठली क्रौर्याची परिसीमा; चाकूने केले सपासप वार

#हडपसर

क्रौर्याची परिसीमा गाठत एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरात सोमवारी (२७ मार्च) रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ससाणेनगरमध्ये सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या चार वर्षीय मुलीसोबत एकटीच राहात होती. काही दिवसांपूर्वीच ही या ठिकाणी राहायला आली होती. 

ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. यासाठी घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. घर मालकाने दरवाजा ठोठावूनही महिलेने दरवाजा उघडला नाही. अखेर शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान यानंतर महिलेने दरवाजा उघडला. 

घरमालक आणि शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. चार वर्षीय चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपी महिला कल्पना वाडेर हिला ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेने नेमके कोणत्या उद्देशाने हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हडपसर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story