कोंढव्यात ६ वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू
पुण्यातील कोंढवा येथील अंतुलेनगर परिसरात खेळत असताना तोल गेल्याने विहिरीत पडून ६ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साई भगवान यादव असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ च्या सुमारास कोंढवा येथील येवले वाडीमधील अंतुलेनगर परिसरात असलेल्या विहिरीजवळ खेळत होता. विहिरीला जाळी बसवलेली आहे. मात्र, खेळताना तोल गेल्याने जाळीतून चिमुकला विहिरीत पडला.
साई विहिरीत पडताच मुळशी तालुका तहशीलदार आणि अग्निशमक दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, साईचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.