विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय मुलगा गतप्राण

वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बस थांब्यानजीक लावलेला एक फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ के.व्ही. वाहिनीचा धक्का बसला. अंकुश खंडू बनसोडे असे मुलाचे नाव असून उपचारा दरम्यान रविवारी (१६ जुलै) त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी महावितरणने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:41 pm
विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय मुलगा गतप्राण

विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय मुलगा गतप्राण

बस थांब्यावरील फलक काढताना बसला विजेचा धक्का

#वडगाव शेरी

वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बस थांब्यानजीक लावलेला एक फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ के.व्ही. वाहिनीचा धक्का बसला. अंकुश खंडू बनसोडे असे मुलाचे नाव असून उपचारा दरम्यान रविवारी (१६ जुलै) त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी महावितरणने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बस थांब्यानजीक एक फलक लावण्यात आला होता. या फलकामुळे काहीच दिसत नव्हते. हा फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसला. हा विद्युत अपघात झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजता घडली होती. दरम्यान, या विद्युत अपघातात जखमी झालेला अंकुश खंडू बनसोडे याचा रविवारी (१६ जुलै) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story